सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्याला जीवदान असलेल्या धरण साखळीतील भाटघर, वीर आणि गुंजवणी ही तिन्ही धरणे भरली असून नीरा नदीपात्रात ४२'९३३ ने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग नदीपत्रात सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6.30 वाजता 32459 Cusecs विसर्गामध्ये वाढ करून 41733 Cusecs इतका सुरु करण्यात येणार आहे. नीरा नदीपत्रात एकूण 42933 Cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.