सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई प्रतिनिधी दि.११
आज दि. 11/08/2022, दुपारी 4.00वा धोम धरणाची पाणी पातळी 744.82मी असून एकूण पाणी साठा 318.42द.ल.घ.मी आहे. सध्या धोम धरणा मध्ये पाणी आवक मध्ये वाढ होत असून आवक 9184 cusecs आहे.
धोम धरणाचे प्रचलित ROS नुसार उद्या दि. 12/08/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता प्रथम आसरे बोगद्या तून 100 cusecs ने धोम बलकवडी उजवा कालव्यातून पुराचे पाणी सोडण्यात येईल.
त्यानंतर उद्या दुपारी 2.00 नंतर धोम धरणाचे power house व सांडव्या व्दारे Krishna नदीत सुरूवातीला एकूण 4000 cusecs विसर्ग सोडण्यात येईल. तसेच धोम धरणातील आवक नुसार विसर्गा मध्ये वाढ करण्यात येऊ शकतो.
नदी काठा वरील गावचे ग्राम प्रशासन, ग्रामस्थ, वाई नगर परिषद,वाई मधील नागरिकांनी सर्तक रहावे, कोणीही नदी पात्रात प्रवेश करू नये, तसेच नदी पात्रातील मोटार, पंप सुरक्षित ठिकाणी त्वरीत हलवावे.