भोर ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आजादी गौरव पदयात्रेने सुरुवात

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आजादी गौरव पदयात्रेने मोठ्या उत्साहात भोर बस स्टॅन्ड ते शिवाजी पुतळा चौक पर्यंत हजारो तरुणांच्या उपस्थितीत हातात तिरंगी झेंडे घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणा देत जल्लोषात सुरुवात झाली.
     पदयात्रा भोर शहरातील चौपाटी येथे आल्यानंतर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पदयात्रेत आमदार संग्राम थोपटे ,आमदार संजय जगताप ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौस्तुभसेठ गुजर, प्रभारी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी उत्कर्षाताई रुपवते, अल्पसंख्यांक पुणे जिल्हा अध्यक्ष दामूशेठ खान, काँग्रेस सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे ,सामाजिक कार्यकर्ते आनंदराव आंबवले,माजी सभापती लहू नाना शेलार ,माजी उपसभापती रोहन भाठे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष गीतांजली शेटे, नगराध्यक्ष निर्मलाताई आवारे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर , गटनेते सचिन हरणस्कर,नगरसेवक अमित सागळे ,गणेश पवार ,देविदास गायकवाड,सुमंत शेटे आदींसह भोर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे व संजय जगताप यांच्या हस्ते पाच तरुण मंडळांना औपचारिकरित्या तिरंगा ध्वज वाटप करण्यात आला.
To Top