वाई ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाईमध्ये जल्लोषात स्वागत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर माय भूमी  मध्ये पहिलाच दौरा असल्याने वाई तालुक्यात नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. वाई तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या वेळे येथे त्याचे प्रथम स्वागत करण्यात आले .यानंतर सुरूर फाटा, सायंकाळी पाच वाजता वाई शहराच्या  प्रवेशद्वारावर सह्याद्रीनगर नाक्यावर कलागार्डन स्नॅक्स समोर सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला गराडा घातल्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी केलेल्या सत्काराने  मुख्यमंत्री भारावून गेले. वाईकरानी केलेले  जल्लोषात  स्वागत स्विकारुन  ना. शिंदे महाबळेश्वरच्या दिशेने  रवाना झाले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णा पवार, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष काशिनाथ शेलार, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, चिटणीस यशवंत लेले,राकेश फुले,विजय ढेकाणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी संदीप जायगुडे, संतोष काळे, संकेत राठोड व कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते , भाजप महिला आघाडी चे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वाई बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संजय खडसरे व त्यांचे पदाधिकारी,अॅड उमेश सणस, अॅड रविंद्र भोसले,अॅड आर आर भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन निवेदन दिले.मात्र यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागताकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.पांचगणी थाप्यावर आर पी आय चे अशोक गायकवाड,स्वप्निल गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांनी जल्लोषात स्वागत केले.
To Top