सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील महिला बचत गटांची संख्या मोठी आहे यातील प्रत्येक महिला भगिनी कडे आप आपल्या बचत गटाचे नाव विविध प्रकारचे उत्पादक म्हणून नावारुपाला यावे या साठीची त्यांची असणारी तळमळ जिद्द आणी चिकाटी असल्या मुळेच आजची महिलांची असणारी ऊपस्थिती हे त्याचे प्रतिबिंब आहे वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणी तालुक्यातील सर्व बचत गटांतील महिलांना एकत्रीत करुन वेळो वेळी करत असलेले मार्गदर्शन लाख मोलाचे आहे.
त्याच्यातुन होणाऱ्या रोजगार निर्मितीतुन प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळाल्या शिवाय राहणार नाही नव नवे व्यवसाय बचत गटांनी ऊभे करण्या साठी लागणारी आर्थिक ताकत देण्यासाठी बॅंकान कडुन जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पंचायत समिती मधील अधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात याचे कौतुक वाटते त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्ना मुळेच आज वाई तालुक्यातील विविध बॅंकानी एकत्रीत येऊन तब्बल दोन कोटी रुपयांचे बचत गटांना वाटप करताना पाहून या सर्वच बॅंक अधिकारी वर्गांचे कौतुक करुन मी त्यांचे अभिनंदन करतो .बचत गटांनीही बॅंकानी दिलेले पैसे कारणी लावून आप आपल्या बचत गटांचे नाव प्रगती पथावर नेहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी केले .
राज्य ग्राम जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कर्ज वितरण मेळाव्यात २ कोटी १ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
तहसीलदार रणजित भोसले,गट विकास अधिकारी नारायण घोलप यांच्या हस्ते तालुक्यातील ४१ गावांतील १११ स्वयंसहाय्यता गटांना हे कर्ज देण्यात आले.
महाराष्ट्र बँक (१ कोटी ३ लाख) स्टेट बँक(१२.६) एचडीएफसी बँक (२६.९),बँक ऑफ बडोदा,(१९.५) सेंट्रल बँक (२० लाख) युनियन बँक (३५.९) यांनी कर्ज वाटप पत्रे बचत गटांना दिली. पाचवड येथील जिव्हाळा दिव्यांग गटाला प्रतिसदस्य १० हजार याप्रमाणे ९० हजार रुपयांचे कर्ज विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले. तहसीलदार श्री.भोसले यांनी जिद्द व महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना रोजगाराभिमुख उद्योग सुरु करण्याचे आवाहन केले. गट विकास अधिकारी श्री. घोलप यांनी पैशांचा उचित वापर व आर्थिक साक्षरता यासंबंधी माहिती दिली.बांधकाम
उपअभियंता संजय जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.पूनम जाधव, सागर अभंग,रंजन वायदंडे,सौरभ फरांदे,माधवी मतकर, समूह साधन व्यक्ती,बँक सखी यांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी प्रयत्न केले.