भोर ! भोरला संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका नाभिक समाजउन्नती संघ भोरच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करन्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून समूहात आरती घेण्यात आली तर अभिषेक,महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प. उमेश महाराज शिंदे यांचे सुश्राव्य किर्तन हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले.                पुण्यतिथीचे औचित्य साधून नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे,पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश पांडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर,मा.उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे,महिला अध्यक्ष बेबीताई क-हेकर, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान शिंदे, मा.अध्यक्ष अंकुश खडके,शहराध्यक्ष चंद्रशेखर जगताप, मोहन सुर्यवंशी,शिवाजी राऊत,गणेश पवार, विकास पालकर,शशिकांत वाघ, दत्तात्रय वाईकर,गुलाबराव शिंदे ,शशिकांत पालकर, चित्रा उल्हाळकर, नंदा शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख शरद पवार यांनी केले तर आभार विकास शिर्के यांनी मानले.

To Top