सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती ततालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम २०२१-२२ चा अंतिम ऊस दर प्रतिटन ३१०० रुपये जाहीर करण्यात आला.
बुधवार दि.२४ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ऊस दर जाहीर केला. कारखान्याने या आगोदर एफआरपी चे २७८०व कांडे बिल १००- रुपये असे एकूण प्रतिटन २८८० रुपये ऊस उत्पादक सभासदांना दिले असून आता उर्वरीत २२० रुपये प्रतिटन दिवाळीच्या दरम्यान देण्यात येणार आहेत.
दरम्यान सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या अंतिम टनाला ३०२० रुपये दर नुकताच जाहीर केला असून सोमेश्वर पेक्षा माळेगाव कारखान्याने टनाला ८० रुपये जास्त दिले आहेत.