बारामती ! लाटे (माळवाडी) येथे जनजागृतीसाठी किशोरवयीन मुलींच्या मेळाव्याचे आयोजन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत मोहोस्तव कार्यक्रमांतर्गत खलाटे वस्ती हायस्कूल मधील  येथे किशोरवयीन मुलींसाठी मेळावा घेण्यात आला यावेळी सुवर्णा कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले.
         खलाटेवस्ती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरिका टिळेकर  यांनी मुलींना स्वसंरक्षणाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले तसेच माळवाडी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका आशिका देवकर यांनी मुलींना मासिक पाळी व आहार विषयक सवयी बद्दल माहिती दिली. मुलींच्या मनात असणाऱ्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात माता पालक उपस्थित होत्या. आशा वर्कर मनीषा नाळे तसेच.प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा गिरमे व त्यांचे सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
To Top