सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई् : दौलतराव पिसाळ
वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आज दि १२/८/२०२२ रोजी कणुर ता वाई येथे ग्रामपंचायतीमार्फत विधवा प्रथा बंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात मा श्री नारायणराव घोलप सर गट विकास अधिकारी पंचायत समिती वाई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कणुर, जिद्द महिला ग्रामसंघ, उमेद अभियान कक्ष व आजी माजी सैनिक संघटना यांच्या पुढाकाराने एतिहासिक विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर करून विधवा महीलांना सन्मानित करण्यात आले..या कार्यक्रमात गावातील बालगोपाल चे वेशभूषा करून महीला व ग्रामस्थ चे उपस्थित प्रभात फेरी घेऊन हुतात्मा मारुती जाधव यांचे हुतात्मा स्मारकाचे पूजन करून कार्यक्रम सूरू केला
सदर कार्यक्रमात मा श्रीमती गीतांजली गरड नायब तहसीलदार संजय गांधी महसूल नायब तहसीलदार ममता भंडारी निवडणूक नायब तहसीलदार आशा दुधे यांनी त्यांचे मनोगत मध्ये विधवा प्रथे मुळे महिलाना होणारा त्रास तसेच आत्तापर्यंत महिलांवर होणारे अन्याय व त्यावर वाचा फोडणे व महिलांनी खऱ्या अर्थाने सबल होनेबाबत माहिती दिली. विभागाचे योजना बाबत देखील विस्तृत माहिती उपस्थितांना दिली तसेच उपस्थित वनक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर
वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता शिंदे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी त्यांचे कार्यालयातील विविध योजना तसेच हे कार्य अजूनही तालुका भर पुढे नेहेणे बाबत प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार
तालुका कृषी अधिकारी शांताराम गोळे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत राहुल हजारे विस्तार अधिकारी सांख्यिकी राऊत अव्वल कारकून उषा गायकवाड जयश्री जायकर
तालुका अभियान व्यवस्थापक पुनम गायकवाड
तालुका कौशल्य व्यवस्थापक माधवी मतकर
तालुका व्यवस्थापक सागर अभंग,सौरभ फरांदे
सरपंच ग्रामपंचायत कणुर निखिल राजपुरे
ग्रामसेवक ग्राम पंचायत कणुर उमेश जाधव
माजी सैनिक संघटना अध्यक्ष शामराव राजपुरे व माजी सैनिक भानुदास राजपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे बैठक व्यवस्था व महीला उपस्थिति बाबत जिद्द महिला ग्राम संघ पदाधिकारी यांनी कार्य केले. तसेच विशेष नावीन्यपूर्ण कार्य करताना गावच्या आजी माजी सैनिक संघटनेने या कार्यक्रमास सत्कारमूर्ती साठी साडी चोळी बांगड्यांचा चुडा त्यांचेमार्फत देऊ करून या जुन्या प्रथेला तिलांजली देण्यास सहकार्य केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामसंघ पदाधिकारी, सीआरपी लिपीका व सर्व महिला यांनी विशेष प्रयत्न केले.