सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासमितीने जगात उत्तम देशाची घटना तयार केली. गेल्या पंचाहात्तर वर्षात देशाचा चौफेर विकास झाला. लोकशाही आणि हुकूमशाही यामध्ये एक पातळ रेष असते. देशाच्या लोकशाहीचे संरक्षण करणे आपले कर्तव्य असून स्वातंत्र्य वीराचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य आबाधित ठेवणे वर्तमानातील आव्हान आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रा, व तिरंगा रॅलीत बोलताना व्यक्त केली खंत, यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस जयदीप शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, सेवा दलचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र भिलारे, विलास बापू पिसाळ ,हणमंतराव पिसाळ ,प्रताप राजे भोसले ,एकनाथ सणस ,भिकू दादा भेलके,सचिन ससाणे ,फैयाज बागवान ,तेजपाल वाघ ,विहार पावसकर ,सचिन काटे , जिल्हा चिटणीस अतुल सपकाळ, तारिक बागवान, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, सुनील बाबर, रमेश पवार , प्रताप यादव , अभिजित यादव , शहाजी पिसाळ सरचिटणीस राजेंद्र पाडळे, प्रशांत शिंगटे, साचीन काटे, गणेश शिंदे,विशाल डेरे , मंजिरी पानसे ,अमृता बांदल यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून, स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे महत्वाचे योगदान आहे, सध्या देशाची अवस्था हुकुमशाहीकडे झुकत असून हुकुमशाहीला बळी पडलेल्या श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाला, भारत देशाची वाटचाल त्याचा दिशेने दुर्दैवाने चालू आहे, घटना रद्दबादल ठरविण्याचा घाट घालण्यात येत आहे, आतंकवाद फोफावला आहे, रशिया आणि युक्रेन यांच्या युध्दामुळे आर्थिक व्यवस्था अडचणीत आलेली आहे. अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना देशाची लोकशाही अडचणीत येवू नये यासाठी एकत्रित प्रयन्त करण्याची गरज असल्याचेही बाबांनी आर्वजून सांगितले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कवठे येथे दुपारी चार वाजता आगमन झाले स्वातंत्र्यसैनिक कै. किसन वीर तथा आबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पृथ्वीराज चव्हाण वाई मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सोनगीरवाडी, वाई न्यायालयाशेजारी असणाऱ्या हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन करून पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफिस मार्गे किसनवीर चौक येथून चित्रा टॉकीज मार्गे गोविंद रामेश्वर मंगल कार्यालयावरून नगरपालिका कार्यालय येथून शहीद स्मारक भाजी मंडई येथे समारोप करण्यात आला , ही पदयात्रा भर पावसात निघाली त्यानंतर टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक प्रदीप जायगुडे यांनी केले तर आभार जयदीप शिंदे यांनी मानले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी वाई काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी युवक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.