भोर ! शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संयुक्त पदयात्रा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 भोर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भोर नगरपालिका यांच्या पुढाकाराने पोलीस ठाणे, पंचायत समिती भोरचे अधिकारी, कर्मचारी तसेच श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल ,अनंतराव थोपटे महाविद्यालय, जिजामाता हायस्कूल ,नगरपालिका शाळा नंबर१,२,३ येथील हजारो विद्यार्थी व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून जल्लोषात वंदे मातरम,भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली.
       पदयात्रा ही नगरपालिका शाळा नंबर १ पासून ते राजवाडा चौक पर्यंत काढण्यात आली होती.पदयात्रा समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील तसेच भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरोळकर यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, नगरपरिषद अधिकारी महेंद्र बांदल ,अभिजीत सोनवणे ,दिलीप भारंबे ,पवन भागणे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
To Top