सोमेश्वर रिपोर्टर टीम--
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोढवे (मोटेवस्ती) येथे रस्त्याच्या कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत लक्ष्मी महादेव मोटे वय 37 वर्षे, व्यवसाय मेंढपाळ, राह- मोढवे, मोटेवस्ती, ता. बारामती जि. पुणे. पाणी पोलिसात फिर्यात दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी रामा सोमा मोटे रा- मोढवे, मोटेवस्ती ता. बारामती जि.पुणे गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 12/08/2022 रोजी दुपारी 2.15 वा. चे सुमारास मौजे मोटेवस्ती, मोढवे गावचे हद्दीत रामा सोमा मोटे यांचे घराजवळील रस्त्यावर ही घटना घडली आहे. यामध्ये तायाप्पा सोमा मोटे वय 60वर्षे रा. मोढवे, मोटेवस्ती, ता. बारामती जि. पुणे. यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादीने फिर्याद दिली मजकुर की,वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीचे सासरे तायाप्पा सोमा मोटे वय 60वर्षे रा. मोढवे मोटे वस्ती ता. बारामती जि पुणे हे आरोपी मजकुर यास तु शेतात जाणारे वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे असे विचारले असता त्या कारणावरुनच आरोपी मजकुर याने फिर्यादीचे सासरे तायाप्पा मोटे यांना शिवीगाळ दमदाटी करून तु या रस्त्याने जायचे नाही "तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला खल्लास करतो" असे म्हणुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी मजकुर याने फिर्यादीचे सासरे तायाप्पा मोटे यांचे हातातील कु-हाड हिसकावुन घेत असताना फिर्यादीचे सासरे तायाप्पा सोमा मोटे हे खाली पडले त्यावेळी आरोपी मजकुर याने कु-हाड हिसकावुन घेवुन फिर्यादीचे सासरे तायाप्पा मोटे यांचे डोक्यात मारत असताना ती कु-हाड फिर्यादीचे सासरे तायाप्पा मोटे यांनी हुकावल्याने त्यांचे डोक्यात न लागता त्यांचे डावे पायाचे पिंडरीवर जोरात लागुन गंभीर जखमी करुन जिवे ठार केले आहे.वगैरे मजकुराची फिर्यादीने दिले फिर्यादीवरुन वरून गुन्हा रजि दाखल करुन गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना पाठविला असून पुढील तपास API सोमनाथ लांडे हे करीत आहेत..