सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील सामाजीक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुवर्णगाथा प्रतिष्ठाणने लोणंद शहरात शरद व्याख्यानमालेच्या निमित्ताने दैनिक लोकमत च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता नगरपंचायत पटागंणात आयोजित केले आहे. तसेच सुवर्णगाथा प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही यावेळेस घेण्यात असल्याची माहिती सुवर्णगाथा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी दिली.
उद्या सायंकाळी होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जननायक आमदार मकरंद पाटील असणार आहेत, या कार्यक्रमात लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचा त्यांनी अवघड खूनाच्या गुन्हाचा कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी निष्पन्न केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे तसेच लोणंद येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी आण्णा बंडू सापते, स्वातंत्र्य सेनानी शहिद मारूतराव जाधव व कै. डाॅक्टर माधवराव जाधव यांचे कुटुंबीय तसेच शहिद जवान संतोष तुकाराम ठोंबरे यांचे कुटुंबीय तसेच लोणंद व परिसरातील माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास फलटण- खंडाळा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजय आवटे हे प्रसिद्ध व्याख्याते असून सामाजिक तसेच राजकीय विषयावर व्याख्याने देत असतात. त्यांचे व्याख्यान हे लोणंद परिसरातील श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.