सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बुवासाहेब ओढ्याला
आणखी एक मोरी वाढविणाची सुचना करणार
असून पुलाच्या कामास उशीर का लागतोय ? या कामाची चौकशी करण्याच्या सुचना अधिका-यांना करणार आहे. बुवासाहेब ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पुरंदरचे आ.संजय जगताप यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील नीरा- शिवतक्रार, पिंपरेखुर्द, थोपटेवाडी येथे मंगळवारी मध्यराञी झालेल्या ढगफुटीने
शेती, पोल्ट्री व घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या भागाची पाहणी पुरंदरचे आ.संजय जगताप यांनी रविवारी ( दि.११) केली. यावेळी नीरा येथील बुवासाहेब ओढ्याची पाहणी करताना ते बोलत होते.
यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, युवक कॉंग्रेसचे महासचिव गणेश जगताप, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, चंदरराव धायगुडे, ग्रा.पं.सदस्य संदीप धायगुडे, अनंता शिंदे,
धनंजय काकडे, दिपक काकडे, विजय शिंदे, सुर्यकांत कांबळे, जावेद शेख, सतिश पवार, राजेंद्र बरकडे, कल्याण जेधे , राजेंद्र दगडे , दत्ता निंबाळकर, संजय हरिहर, अजित जगताप आदी ग्रामस्थ , तरूण वर्ग उपस्थित होता.
यावेळी मीना लकडे, अनिता हरिहर या महिलांनी ओढ्याच्या पुराचे पाणी घराला लागल्याने भीतीचे वातावरण झाले होते. त्यामुळे ओढ्याच्या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, तसेच सर्व्हीस रस्ता करण्यात यावा अशी मागणी आ.संजय जगताप यांच्याकडे केली. तर वैशाली राजेंद्र निगडे यांनी नीरा- गुळूंचे रोडवर पडलेल्या खडीमुळे अपघात होत असल्याचे आ.संजय जगताप यांचे लक्ष वेधले.
यावेेेेेेेेळी ग्रा.पं.सदस्य संदीप धायगुडे , राजेंद्र दगडे, बाबुराव दगडे यांनी बुवासाहेब ओढ्याला पाण्याच्या प्रवाहानुसार पुलाच्या मो-या झाल्या नसल्याने पुल पुर्ण झाल्यानंतर भविष्यात पाण्याने पुलाचा भराव खचू शकतो. तसेेच ओढ्याच्या लगतच्या रहिवाशांना पुन्हा ञासाला सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त करून ओढ्याला बुवासाहेब मंदीराच्या बाजूकडे आणखी एक मोरी वाढविण्याची मागणी आ.संजय जगताप यांच्याकडे केली.
तसेच ठेकेदाराला पुलाच्या कामाचे बिल मिळत असून ठेकेदार पुलाचे काम जाणीवपुर्वक लवकर करीत नसल्याच्या तक्रारी नीरा, दगडेवस्ती, गुळूंचे परिसरातील नागरिकांनी आ.संजय जगताप यांच्याकडे तक्रारी केल्या.
----------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांबरोबर मंगळवारी बैठक घेणार असून यावेळी ओढ्याच्या पुलाच्या कामाची चौकशी करणार आहे. तसेच ढगफुटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे तातडीने करण्याची सुचना पुरंदरच्या तहसीलदारांना केली असल्याचे आ.संजय जगताप यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------------