बारामती ! 'वाणेवाडी'तील मांडववाल्याच्या लेकीचा देशात डंका.....! बारामतीच्या पश्चिम भागातील पहिलीच महिला दिल्लीत खेळणार दंगल...!

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
वाणेवाडी(ता. बारामती) येथील सायली नारायण जगताप हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २१ ते २२ सप्टेंबर या कालावधीत १७ वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. 
        कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेली सायली सोमेश्वर परीसरातील पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली असून हिचे अभिनंदन होत आहे. वाणेवाडी येथील माजी सैनिक आणि प्रशिक्षक प्रशांत भोसले हे गेल्या चार वर्षांपासून एकता तालीम संघाच्या माध्यमातून युवक- युवतींना कुस्तीचे धडे देत आहेत. सध्या या तालमीत ४० कुस्तीपटू सराव असून भोसले त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. सायलीचे वडील नारायण जगताप हे मंडप व्यवसायिक म्हणून काम करतात. 
To Top