बारामती ! ज्योतिबा सोसायटीचा शेतकरी फिरणार आता....! १७ लाखांच्या ह्युंदाई क्रेटा मधून

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ज्योतिबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि (मळशी) वानेवाडी या संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बळवंत काकडे यांना क्रेटा या फोर व्हीलर गाडीचे वितरण करण्यात आले. 
      पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष लक्ष्मण काकडे, माजी अध्यक्ष  दत्तात्रत जगताप, शहाजी जगताप, अविनाश जगताप, रवींद्र जगताप, प्रकाश जगताप, प्रकाश जगताप, दिलीप जगताप, विलास जगताप, हनुमंत जगताप, रोहिदास जगताप, शशांक जगताप, सागर काकडे, संकेत जगताप सचिव धन्यकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 
संस्थेचे सर्व संचालक व सभासद हजर होते.  यावेळी संस्थेने सन २०२२-२०२३ या साला करता सभासदांना सात टक्के लाभांश देण्याचे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले संस्थेची वार्षिक साधारण सभा ही शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बळवंत काकडे व सचिव धन्यकुमार जगताप यांनी दिली.
To Top