सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई शहरातील रेडीमेड.होजरी गारमेंटचे होलसेल व्यापारी ऊद्योजक असलेले महाराजा फर्मचे मालक सागरसेठ हेमराजजी नाणेशा ओसवाल यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले .
त्यांच्या व्यवसाया मुळे राज्यासह परराज्यातील नामवंत व्यापारी वर्गाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते .सातारा जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील नामवंत शाळा आणी महाविद्यालयांना दर्जेदार स्कुल ड्रेस ब्रेजर स्पोर्ट ड्रेस पुरवठा करण्या मध्ये त्यांचा नाव लौकिक होता . ते मनमिळाऊ स्वभावाचे आणी
शांत संयमी वृत्तीचे असल्याने स्वताच्या ऊद्योग व्यवसाया मध्ये नेहमीच प्रगती पथावर होते .त्यांच्या अचानक मृत्यूने सर्व थरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे .त्यांच्या वर वाई येथील कृष्णा नदी काठावर असलेल्या स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या अंतविधीस सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार राजकीय व्यापारी यांच्या सह जैन समाजातील मान्यवर ऊपस्थित होते.
वाई व्यापारी महासंघाचे सदस्य असलेले अमीत ओसवाल आणी गौरव ऊर्फ गुंड्या ओसवाल यांचे ते वडील आहेत .