सोमेश्वर रिपोर्टर टीम- -----
वाई : प्रतिनिधी
वाईचा पश्चिम भाग पुन्हा अपघाताने हादरला दोन दुचाकींचा समोरा समोर झालेल्या भिषण अपघातात खावलीचा तानाजी शेलार या तरुण चा ऊपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खावली गावावर शोककळा पसरली आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातारा तालुक्यातील पुनर्वसन रेणावळे येथुन वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी ज्ञानदेव चंद्रकांत सणस वय २४ हे आपल्या दुचाकी वरुन आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते तेथुन ते परतत असताना दुपारी त्यांची दुचाकी ४ |३० ला धोम गावच्या हद्दीत आली असता समोरुन भरघाव वेगाने येणार्या दुचाकीने सणस यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिल्याने दोन्हीही दुचाकी स्वार गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत वाई जांभळी जाणार्या रस्त्यावर पडले .हे पाहून पुढे दुचाकी वर गेलेले सणस यांच्या चुलत भावाने पाहीले व ते तातडीने अपघात स्थळावर पोहचले या गंभीर अपघाताची माहिती धोम गावचे पोलिस पाटील असलेले ऊमेश शिर्के खावली गावचे पोलिस पाटील नितीन शेलार यांना समजताच तेही अपघाताच्या ठिकाणी पोहोचले वरील सर्वांनी वाईच्या दिशेने जाणारी वाहने आडवुन जखमींना तातडीने ऊपचारा साठी वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले .
या गंभीर अपघाताची माहिती साप्ताहिक सुट्टी असताना देखील पोलिस ठाण्यात हजर असलेले पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी अपघात स्थळाकडे धाव घेऊन अपघाताची माहिती घेऊन वाहतुकीला अडचन होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेल्या दुचाकी बाजुला काढल्या आणी वाहतुक सुरळीत केली .दवाखान्यात जावुन जखमींची माहिती घेतली .पण या अपघातात गंभीर जखमी असलेला तानाजी नवलु शेलार वय ३३ राहणार खावली ता.वाई या तरुणाचा ऊपचारा
दरम्यान सायंकाळी मृत्यू झाल्याने खावली गावावर शोककळा पसरली आहे .
पाच दिवसा पुर्वी याच पश्चिम भागातील लोकांचा मुंबई कडे जात असताना झालेल्या भिषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा खावली गावच्या तरुणाचा मृत्यू झाल्याने पश्चिम भागाला हादरा बसला आहे .या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे .