जावली ! प्रतिनिधी : धनंजय गोरे ! कास पठार फुलले...! आज पासून पर्यटकांसाठी खुले...! यावर्षी पासून मिळणार जंगल सफारीचा आनंद

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : धनंजय गोरे 
रंगीबेरंगी नैसर्गीक फुलांची पंढरी म्हणुन जगभर ख्याती पसरलेल्या कास पुष्पपठार वरील या वर्षीच्या हंगामाचा शुभारंभ  कोल्हापुर वनवृत चे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजम  यांच्या शुभहस्ते फित कापुन करण्यात आला  कास पठारावर निसर्गाचा अनमोल ठेवा असुन त्याच्या जतनाशी कोणतीही तडजोड होता कामा नये फुलांची घटती संख्या लक्षात घेऊन त्यामध्ये कशी वाढ होईल यासाठी उपाययोजना व्हाव्या अशा सक्त सुचना देत वनसमीतीचे  कार्य कौतुकास्पद असुन वनविभागाच पुर्ण सहकार्य लाभेल असे गौरवोद्गार त्यांनी काढले    पहिल्याच दिवशी हजारो पर्यटकांनी अधुन मधुन पडणार्‍या रिपरिप पाऊस धुक्याच्या धुलईत  रानफुलांसह निसर्गाचा मुनमुराद आनंद लुटला

          यावेळी कोल्हापुर वनवृत चे मुख्यवनसंरक्षक आर एम रामानुजम सातारा उपवनसंरक्षक उत्तम सावंत सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले  माजी जि प सदस्य राजु भोसले जावली वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी सातारा वनक्षेत्रपाल  निवृती चव्हाण नगरसेवक रविंद्र ढोणे  वनपाल विश्वनाथ बेलोशे  वनसमीती उपाध्यक्ष दत्ता किर्दत सदस्य सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर आखाडे रामचंद्र उंबरकर सिताराम बादापुरे दत्ताराम बादापुरे विठ्ठल कदम प्रदिप कदम विजय वेंदे संगीता आहीरे सोमनाथ बुढळे बावीस गाव संघटनेचे अध्यक्ष राम पवार के . के . शेलार , निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे , वनरक्षक एस बी शेलार , एस ए शिंगाडे , आर एन जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवरांनी पठारवरील दुर्मीळ फुलांची माहीती करून निसर्गचा आनंद घेतला

          जांभळ्या निळ्या लाल गुलाबी पांढऱ्या आधी विविधरंगी फुलांना बहर चढु लागला असुन गेंद तेरडा निलिमी चवर आभाळी सितेची अस्व टुथब्रश सोनकी आबोलिमा आम्री रान हळद रान गवार आदी विविध प्रकारच्या वनसंपदाची फुले बहरली असुन येत्या आठ दहा दिवसात फुलांचे गालीचे सर्वत्र चादर पहायला मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे

          फुले पहाण्यासाठी प्रती माणशी १०० रुपये प्रवेश शुल्क  वाहन पार्कींग कार ४० बस ६० रुपये पार्कींगस्थळ ते पठार १० रुपये बस तिकीट गाईडसाठी १०० रुपये आकारले जाणार आहेत हंगाम  सुरळीत पार पाडण्यासाठी १२० कर्मचाऱ्यांची वन समीतीने नेमणुक केली असुन यातिल १५ जण गाईड म्हणुन काम पाहणार आहेत पिण्याचे पाणी शौचालय निवारा शेडची सुविधा निर्माण केली असुन पठारावरील रोड वरून फिरण्या साठी भाडे  तत्वावर सायकल सुविधाही निर्माण करण्यात आली आहे घाटाई रोड व कास तलाव अशा पठार.दोन्ही बाजुला वाहन स्थळ निर्माण केली आहेत पहिल्याच दिवशी आलेल्या पर्यटकांनी ऑनलाईन बुकींग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली ऑनलाईन साईटला प्रॉब्लेम आल्याने बुंकीग होऊ शकली नाही रविवार ऊदया पासुन वेब साईट सुरळीत होणार  असुन जास्तीत जास्त पर्यटकांनी ऑनलाइन बुकींग करूनच फुलांचा आनंद घेण्या साठी पठार वर यावे असे वनसमीतीच्या पदाधीकाऱ्यांकडुन सांगण्यात आले
--------------------------
यावर्षापासून पर्यटकांना आणखी आनंद  द्विगुणीत करता येणार असुन दिवसा जंगलसफारीचा आनंद घेता येणार आहे यासाठी वनसमीतीची दोन  वाहने कार्यरत असून एका वाहनात आठ प्रवाशांना बसता येणार आहे यासाठी ४००० हजार रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे
To Top