वाई : दौलतराव पिसाळ
खंडाळा येथील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणाऱ्या एस कॉर्नर वर झालेल्या विचित्र आणी भिषण अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले व सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे .
सतत अपघातांच्या मालिके मुळे आज पर्यंत अंदाजे ५० जणांचा बळी घेणार्या खंडाळा तालुक्यातील एस कॉर्नरवर भरघाव वेगात येणार्या एका ट्रक टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पुढे चालत असलेल्या सहा फोरव्हिलर गाड्यांना जोराच्या धडका देत रस्त्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर जाऊन आदळल्याने तो जागीच पलटी झाला .झालेल्या या भिषण अपघात एक जण जागीच ठार झाला तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत .या अपघाताची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे .
समक्ष पोलीस ठाणेत हजर होवुन देतो जबाब की, वरील ठिकाणी मी माझी पत्नी सौ. निलीमा असे माझे मालकीची मारुती अल्टो कार क्र.एम.एच.१४.एक्स. ४०५७ हि असुन ती मी वापरतो. आज तारीख-२७/०९/२०२२ रोजी आमचे नातेवाईकांचे लग्न सातारा येथे असल्याने मी व पत्नी
सौ.निलीमा असे आमचे अल्टो कारने सकाळी १०.०० वा.चे सुमारास देहुगाव, पुणे येथुन सातारा येथे आलो.
लग्नाचा विधी संपल्यांनंतर दुपारी २.०० वा.चे सुमारास परत देहुगाव, पुणे येथे जाणेसाठी मी व पत्नी असे आमचे
कारने निघालो. कार मी स्वत: चालवित होतो. आम्ही सातारा पुणे जाणारे हायवे रोडने पाचवड, भुईंज, वेळे,
खंबाटकी बोगदा पास करुन बेंगरुटवाडी, ता. खंडाळा गावचे हद्दितील धोम बलकवडी कॅनॉलपासुन पुणे बाजुकडे
सुमारे ४०० मीटर अंतरावर आलो असता दुपारी ३.३० वा.चे सुमारास आमचे कारचे पाठीमागून येणाऱ्या
वाहनाला ट्रक टँकरने जोराची धडक दिलेचा आवाज येवुन सदरचा टँकर हा वेगात येवुन माझे कारला पाठीमागुन
येवुन धडक दिली. तशी आमची कारचे तोंड फिरुन सातारा दिशेला झाले. म्हणुन मी व पत्नी असे आम्ही
गाडीतुन उतरुन पाहिले असता आमचे कारला धडक देणारा ट्रक टँकर हा पुढे वेगात जावुन आशयर टेम्पोला
जोरात धडक देवुन पुढे मातीच्या ढिगाऱ्यावर जावुन तेथे उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीवर पलटी झालेला तसेच
माझ्या कारला धडक देण्यापुर्वी सदर ट्रक टँकरने पिकअपला धडक दिल्याने ती पलटी होवुन अपघात झाल्याचे दिसले. म्हणुन मी सदर पिकअप जवळ जावुन पाहिले असता तिचा क्र. एम.एच.०९.इ.एम.४७९४ असा असल्याचे तसेच त्यामधील तीन इसमांना डोकीस, तोंडाला, हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागुन ते रक्ताने माखलेले दिसले. तेव्हा त्यातील एका इसमाकडुन त्यांचे नावे, गाव रोहित संजय जाधव वय-१८ वर्षे, चालकाचे नाव गणेश अनिल तडाखे वय-२५ वर्षे, सचिन मानसिंग गोसावी वय-२३ वर्षे, सर्व रा. मांगले,ता.शिराळा, जि. सांगली असे
असल्याचे समजले. त्यानंतर मी अपघातग्रस्त आयशर टेम्पो जवळ गेलो असता त्याचा क्र.एम.एच.४.जी.यु.६८८८
असा असल्याचे तसेच त्यावरील चालक व त्याचे सोबत असलेला एक इसम यांना किरकोळ व मुक्का मार लागुन
जखमी झाल्याचे दिसले तेव्हा चालकाकडुन त्याचे नाव शकिल दावत शेख वय-३४ वर्षे व त्याचे सोबत असणाऱ्या
इसमाचे नाव किरण वैजिनाथ शिंदे वय १८ वर्षे, दोन्ही रा.काळेवाडी फाट, थेरगाव, पिंपरी, पुणे असे समजले.
नंतर मी सदरचा अपघात करणारा ट्रक टँकरजवळ गेलो असता त्याचा क्र.एम.एच.१३.सी.यु.९९०० असा
असल्याचे तसेच तो ट्रॅक्टर क्र.एम.एच.११.यु.३९१६ वर पलटी झाल्याचे दिसला. सदर अपघातग्रस्त ट्रक टँकर
वरील चालक व त्याचे सोबत असणारा इसम यांना हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागुन जखमी झाल्याचे दिसले तेव्हा सदर चालकाचे नाव श्रीशैल मारुती कांबळे वय-३८ वर्षे, तसेच त्याचे सोबत असणारे इसमाचे नाव प्रदिप आमशिदा बेल्लेनवार वय-३६ वर्षे, दोन्ही रा.उमारनी, ता.इंडी, जि. विजायाकुरुमरानी, बिजापुर, राज्य-
कर्नाटक असे असल्याचे समजले. तसेच ट्रॅक्टरजवळ उभा असलेला राहुल मोहन वायदंडे रा.खंडाळा, ता. खंडाळा
याचे उजवे हातास किरकोळ खरचटुन जखमी झाल्याचे दिसले. त्यानंतर थोडयावेळाने पोलीस व अॅम्बुलन्स असे
मदतीकरीता आले त्यांनी अपघातातील सर्व जखमींना जमलेल्या लोकांचे मदतीने अॅम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय
खंडाळा येथे पाठविले. त्यानंतर अपघातातील पिकअप जीपमधील जखमी नामे सचिन मानसिंग गोसावी यास
अपघातात झाले गंभीर दुखापतीमुळे तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे समजले. सदर झाले अपघातात माझी कार
क्र.एम.एच.१४. एक्स.४०५७, पिकअप जीप क्र.एम.एच.०९.इ.एम.४७९४, आयशर टेम्पो क्र.एम.एच.४.जी.यु. ६८८८, ट्रक्टर क्र.एम.एच.११.यु.३९१६ चे नुकसान झाले आहे. सदरचा अपघात हा ट्रक टँकर क्र.एम.एच. १३. सी. यु. ९९०० वरील चालक नामे श्रीशैल मारुती कांबळे वय-३८ वर्षे, रा.उमारनी, ता.इंडी, जि. विजायाकुरुमरानी, बिजापुर, राज्य कर्नाटक याचे चुकीमुळे झाला आहे.
तरी ता. २७/०९/२०२२ रोजी दुपारी ३.३० वा.चे सुमारास मौजे बेंगरुटवाडी, ता.खंडाळा,
जि. सातारा गावचे हद्दित सातारा ते पुणे जाणारे हायवे रोडवर खंबाटकी बोगदयाचे बाहेर थोम बलकवडी
कॅनॉलपासुन पुणे बाजुकडे सुमारे ४०० मीटर अंतरावर ट्रक टँकर चालक नामे श्रीशैल मारुती कांबळे
वय-३८ वर्षे, रा.उमारनी, ता. इंडी, जि. विजायाकुरुमरानी, बिजापुर, राज्य कर्नाटक याने त्याचे त्याब्यातील
ट्रक टँकर क्र. एम.एच.१३.सी.यु.९९०० हा हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे, रस्त्याचे परिस्थिकडे
दुर्लक्ष करुन, भरधाव वेगात चालवुन पुढे चालले माझी कार क्र.एम.एच.१४.एक्स.४०५७ तसेच पिकअप
जीप क्र. एम. एच.०९.इ.एम.४७९४, आयशर टेम्पो क्र. एम. एच. ४. जी.यु.६८८८, ट्रक्टर क्र.एम.एच.११.
यु. ३९१६ ला पाठीमागुन जोराची धडक देवुन अपघात करुन अपघातात पिकअप मधील इसम नामे सचिन
कमानसिंग गोसावी वय-२३ वर्षे, याचे किरकोळ व गंभीर दुखापत करुन त्याचे मरणास तसेच १) रोहित
संजय जाधव वय १८ वर्षे, २) गणेश अनिल तडाखे वय-२५ वर्षे, सर्व रा. मांगले,ता.शिराळा, जि. सांगली,
३) शकिल दावत शेख वय-३४ वर्षे, ४) किरण वैजिनाथ शिंदे वय १८ वर्षे, अ.नं.३ व ४ रा.काळेवाडी फाट,
थेरगाव, पिंपरी, पुणे, ५) प्रदिप आमशिदा बेल्लेनवार वय-३६ वर्षे, रा.उमारनी, ता.इंडी,
नमुद सर्व वाहनांचे जि.विजायाकुरुमरानी, बिजापुर, राज्य-कर्नाटक, ६) राहुल मोहन वायदंडे रा.खंडाळा, ता.खंडाळा,
जि. सातारा यांचे व स्वतःचे किरकोळ व गंभीर दुखापतीस तसेच अपघातातील वरील नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन माझी त्याचे विरुद्ध तक्रार आहे.
या अपघाताची तक्रार राजेंद्र नारायण काकडे वय ५९ राहणार देहुगाव आळंदी यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .याचा अधिक तपास खंडाळा पोलिस करीत आहेत .