सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील रहिवासी असलेले बाळ काका ऊर्फ कृष्णराव राजाराम पिसाळ देशमुख यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःख द निधन झाल्याने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे .
बाळ काका हे गेली कित्येक वर्षांपासून भाजप या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी या पक्षात विविध प्रकारची जबाबदारी असणार्या पदांनवर यशस्वी कामगीरी करुन ओझर्डे गावासह पाचगणी खंडाळा व इतर तालुक्यातील गावांन मध्ये भाजप हा पक्ष वाढावा या साठी ते सदैव प्रयत्नशील असायचे या पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची वेगळी ओळख होती .पक्षाच्या माध्यमातुन त्यांनी अनेक गोरगरीबांना न्याय मिळवून दिला .पण आज अचानक पणे ओझर्डे येथील राजहंस मधील बाळ काका इश्वर चरणी विलिन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे .
त्यांच्या पश्चात चार मुली आणी एक मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे .त्यांच्या वर
ओझर्डे येथील कृष्णा नदी काठावर असलेल्या सोनेश्वर स्मशान भूमीतअंत्यसंस्कार करण्यात आले .