सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ या वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ३०) दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध विषयांवर विचार करण्यासाठी बोलविण्यात आली आहे. कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे. सभेस येतेवेळी प्रवेश पत्रिका व कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे यांनी केले आहे.