भोर ! भाटघर,वीर धरण प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधांसाठी ७ कोटी ८४ लाख निधी मंजूर : आ. संग्राम थोपटे यांची माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील भाटघर व वीर धरण प्रकल्पांतर्गत नागरी सुविधांचा लाभ प्रकल्प बाधतांना होणार नाही अशी बहुचर्चित चर्चेला तालुक्यात उधान आले होते.मात्र आमदार संग्राम थोपटे यांच्या अथक व कडव्या प्रयत्नाने दुसऱ्या टप्प्यातील नागरी सुविधांच्या कामांसाठी ७ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे मंगळवार दि.२७ पत्रकार परिषदेत आमदार थोपटेंनी माहिती दिली.यावेळी भाटघर प्रकल्पग्रस्त सेवा संघ व वीर धरण प्रकल्प सेवा संघाचे योगदान असल्याचे आमदार थोपटे यांनी नमूद केले.
    थोपटे पुढे म्हणाले भोर ,वेल्हा व मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यावरील चालू वर्षात अतिवृष्टीत पडलेले खड्डे बुजवण्याचे काम दोन वेळा करण्यात आले होते. मात्र तालुक्यात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर असल्याने पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत.हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.सदरची खड्डे बुजवण्याची कामे लवकरच पूर्ण केली जातील.तर  शिंदेवाडी फाटा - भोर वरंधा घाट - महाड रस्ता राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी ६ कोटी ६५ लक्ष ७२ हजार ७३७ रुपये इतक्या रकमेस मान्यता मिळाली आहे. सदरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामकाजही लवकर सुरू करण्याचे आदेश संबंधित विभाग देण्यात आले आहेत.
To Top