सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील वरवडी (शारताटी)ता.भोर येथे सोमवार दि.२६ शेतात महावितरणच्या लघु दाब वाहीनीच्या विद्युत वाहक तार तुटून शेतात काम करीत असताना अंगावर पडून विजेच्या धक्क्याने सुभद्रा सोनबा वरे वय-७५ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.आमदार संग्राम थोपटे यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना केल्याने महावितरणकडून त्वरित मृत महिलेच्या कुटुंबीयास २० हजारांची मदत देण्यात आली.तर ४ लाखांचा अपघाती विमा लवकरच मंजूर करून देण्याच्या सूचना थोपटे यांनी महावितरणचे अधिकारी संतोष चव्हाण यांना दिल्या.