सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
तृतीयपंथीय श्रेया साळवे यांनी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कायद्याची पदवी घेतली मात्र सराव करण्यासाठी नामवंत विधीज्ञ तज्ञांनी नकार दिल्याने सरावा शिवाय मी कशी वकिल होणार हि चिंता भेडसावत आहे.सराव करण्यासाठी मदत करण्यासाठी खरंच कोणी पुढे येईल का? असा प्रश्न विचारला आहे.
बारामती येथे वास्तव्य करणाऱ्या तृतीय पंथीय श्रेया गोपाळ साळवे यांनी बारामती प्राथमिक, महाविद्यालय शिक्षण घेऊन कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.हि पदवी घेतल्यानंतर नामवंत विधीज्ञ यांच्याकडे सराव केला जातो.सरावा नंतरच वकिली व्यवसाय जोमाने करता येतो.
मात्र साडी घातली असल्याने व तृतीय पंथीय असल्याने बारामती शहरात काही नामांकित विधीज्ञ तज्ञांनी श्रेया यांना सराव करण्यासाठी नकार दिला आहे.वकिली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सराव महत्त्वाचा भाग आहे.चांगला विधीज्ञ तज्ञ उत्तम सराव करुन घेतो.याचा उपयोग नविन पदवी घेणा-याला फायदा होतो.त्याला स्वतःच्या व्यावसायासाठी याचा उपयोग होतो.
एकीकडे शासन तृतीय पंथीयांना सन्मान मिळावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते.दुर्देवाने समानतेच्या पोकळ गप्पा मारणारे तथाकथित तृतीय पंथीयांना तशी वागणूक देत नाहीत.तिच गत श्रेयाची असुन कायद्याची पदवी घेऊन सुद्धा तिला सरावासाठी याच कायद्याचा उपयोग करावा लागणार आहे.
--------------------
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून मी कायद्याची पदवी घेतली. शिक्षण घेताना काहीच अडचण आली नाही.मात्र सरावासाठी मी तृतीय पंथीय असल्याने नकार मिळत असल्याने खंत वाटते.
ॲड.श्रेया साळवे - तृतीयपंथीय