सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
खोपवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदिप सुभाष चांदगुडे तर उपाध्यक्षपदी निर्मला विकास चांदगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यापुर्वीचे अध्यक्ष लालासाहेब नगरे व उपाध्यक्ष धुळाजी चोरमले यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी या नवनिर्वाचितांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मिलींद टंकसाळे, सचिव संजय जाधव यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध होण्याकामी सोसायटीचे माजी चेअरमन अनिल चांदगुडे, उमाकांत नगरे, माजी उपसरपंच शांताराम चांदगुडे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी सोसायटीचे संचालक ज्ञानदेव चांदगुडे, भानुदास चांदगुडे, ज्ञानदेव सर्जेराव चांदगुडे, महादेव जगताप, ज्ञानदेव माणिक चांदगुडे, गणेश निवृली चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, कुसुम जगताप, जालिंदर चांदगुडे आदी उपस्थित होते.
.........................................