सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे.
काल दि २१ रोजी हा जमीन मंजूर झाला. सुभाष धुमाळ हे कार्यालयीन अधीक्षक असताना त्यांनी पैसे देण्यासाठी परवानगी दिली. असा ठपका ठेवण्यात आला होता. यापूर्वीच सोमेश्वर कारखान्यातील दहा हजारांच्या शेअर्सचा अपहार करण्यात सहभागी असल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी श्रीकांत काकडे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १९ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी बारामती न्यायालयाने सुनावली होती. त्यांना जमीन मिळाला असून सुभाष धुमाळ यांनाही जमीन मंजूर करण्यात आला आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात मनीषा देशमुख व अनिता देशमुख या बहिणींचे प्रत्येकी पाच हजारांचे असलेले शेअर्स २०११ साली बनावट सह्या करून काढून घेतले होते, अशी फिर्याद अभिजित देशमुख यांनी वडगांव निंबाळकर पोलिसांत दिली होती. आरोपीच्या वतीने adv. शंतनू माळशिकारे यांनी बाजू मांडली.