सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे.
हे रक्तदान शिबीर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दुरक्षेत्र, माऊली मंगल कार्यालय सुपा, सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव व शिरष्णे येथे सकाळी ९ ते ५ पर्यंत पार पडणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
COMMENTS