सोमेश्वर रिपोर्टर टीम---
शिरोळ : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेविका कमलाबाई कृष्णराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, प्रथम महिला उपनगराध्यक्षा म्हणून कमलाबाई शिंदे यांना मान मिळाला आहे, दरम्यान ही निवड जाहीर होताच शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला,
येथील नगरपरिषदेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते, यावेळी मुख्याधिकारी तैमूर मुलांनी उपस्थित होते,
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत कमलाबाई शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षापदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी जाहीर केले,
या निवडीनंतर बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वानुमते निर्णय घेऊन शहराचा विकास साधला जातो, शिवाय नगरपरिषद पदाधिकारी निवड प्रक्रिया बिनविरोध करण्याची परंपरा कायम जपली जात आहे हे भूषणावह असून सभागृहातील जेष्ठ नगरसेविका व आमच्या भगिनी कमलाबाई शिंदे अक्का यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले,
या सभेत माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील, नगरसेवक पै प्रकाश गावडे ,राजेंद्र माने, योगेश पुजारी, राजाराम कोळी, इमरान आत्तार, तातोबा पाटील ,एन वाय जाधव, नगरसेविका जयश्री धर्माधिकारी, विदुला यादव, करुणा कांबळे , सुरेखा पुजारी, कविता भोसले, कुमुदिनी कांबळे , अस्मिता शिंदे, पत्रकार दगडू माने, सामाजिक कार्यकर्ते सुभाष माळी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नूतन उपनगराध्यक्षा सौ शिंदे याना शुभेच्छा दिल्या,
यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल पाटील, पदमसिंह पाटील ,डॉ अरविंद माने, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे, अमरसिंह शिंदे ,आण्णासो पुजारी, सुरज कांबळे ,दिनकर पाटील, गायत्री मुळीक, कृष्णराव शिंदे, भूषण गंगावणे यांच्यासह शिरोळ परिसरातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
दरम्यान, नूतन उपनगराध्यक्ष कमलाबाई शिंदे म्हणाल्या, शहराचा विकास महत्त्वाचा आहे, नागरी प्रश्नांबरोबरच।सुधारित नळपाणी पुरवठा, गावठाण हद्दवाढ , शिवस्वराज भवन, ग्रामदैवत बुवाफन व नूरखान बादशाह उरुस भरणारी सि.स नंबर २८७३ खुली जागा आदि मंजूर कामे करणार असून नगराध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रभागवार सुरू आहेत, त्यांच्या सहकार्याने सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले जातील असे उपनगराध्यक्षा शिंदे यांनी सांगितले.
-------------
भाऊ -बहीण बनले : नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष
शिरोळ ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे,
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षपूर्ती साजरी होत असताना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या शिरोळ येथील शिंदे आणि पाटील या दोन्ही घराण्यातील भाऊ- बहीण यांना नगरपरिषदेच्या पदावर संधी लाभली आहे, शिरोळ नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या भगिनी कमलाबाई शिंदे यांची शुक्रवारी प्रथम महिला उपनगराध्यक्षपदी निवड झाली ,
या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीने नगरपरिषदेच्या सभागृहातील
हा योगायोग सर्वत्र चर्चेचा ठरला आहे,
---------------------