सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्नेहमय हितगुजाच्या गप्पा...
तीन सप्टेंबर २०२२.गणेशोत्सवाचे आनंदमय वातावरणात.तब्बल सात वर्षांनंतर जेथे पस्तीस वर्षात जीवन सुंदर झालं.जगणं सुखमय झालं आशा सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर येथे व्याख्यानाच्या निमित्ताने जाण्याचा सुखद योग आला.पूर्वस्मृती जाग्या झाल्या पण ते सहजीवन सहकारी नव्हते.होते ते मोजकेच.ते पण वयाने धाकले.जेथे जिज्ञासा, कुतुहल,आणि प्रगल्भता वाढीस लागली.रुसवे,फुगवे,मतांतरे,पुन्हा लोभ याची बेरीज वजाबाकी झाली त्या विसर सीमेवरुन येताना थोडं गलबलल्यासारखं झालं.कारण त्या सहकाऱ्यापैकी कांहीजण परत कधी न येणाऱ्या प्रवासाला न सांगताच निघून गेलेत तर उरलेले आप आपल्या संसारात,नातवंडात मावळतीच्या सावल्यात उर्वरित जीवन जगत आहेत.नोकरीच्या स्नेहमय प्रवासातील ही ताटातूट..तेथील चराचरात पावलापावलाच्या आठवणी भरुन राहिल्यात पण ते सर्व अबोल.निशब्द.मनाने समजावून घ्यायचं.एवढचं.धाकल्या सहकाऱ्यांनी मनभरुन स्वागत केलं.तसा आपुलकीचा पाहुणचार ही..मनातील अस्वस्थता हळूहळू विझत गेली.माझ्या आवडत्या कविता मनाच्या कप्प्यात जपलेल्या होत्या त्या मनापासून व्यक्त केल्या.त्या कवीची ओळखही करुन दिली.त्यांच्या शब्दांचे संगीताने कसे सोने केले त्यामुळे सामांन्यांच्या जिभेवर आज ही कशा रेंगाळत आहेत.कारण ते अक्षय साहित्याचा तो खजिना आहे.त्या कवी,गायक, संगीतकार यांच्या कार्याला उजाळा देत कार्यक्रम झाला पण ओळखणारे विद्यार्थी होते कुठे तसे कांही शिक्षक शिक्षिकांही..साद प्रतिसादात कार्यक्रम झाला.निरागस,लोभस हातांच्या टाळ्या आणि कृतज्ञतामय मनांनी व्यक्त केलेले प्रेमळ ओलाव्याचे आभार मनाला स्पर्शून न जाईल तर नवल...! सरत्या काळात आशा स्नेहमय भेटी लाखमोलाच्या...प्राचार्य मिंडसर,श्री.डी.टी.वाडकर सर,वाय.एस.शिंदे,प्रा.माने सर,मांडकीच्या सौ.जगताप मॅडम,सौ.शेंडकर मॅडम,सौ.खोमणे मॅडम श्री.रणवरे सर,श्री.डी.जी.निगडे सर,श्री.पी.बी.जगताप सर प्रा.सावंत,प्रा.लोणकर आणि नामोल्लेख न केलेले शिक्षक बंधू भगिनी यांच्याबरोबर हितगुजाच्या गुजगोष्टी करत जड अंतःकरणाने घराकडे पावलं वळली ती भूतकाळातील आठवणींची शिदोरी घेऊन....पण अस्वस्थता मनाला चिरुन गेली.अव्यक्त शब्दांच्या पलिकडे...
श्री.एस.एस.गायकवाड सर, करंजेपूल मो.नं.७७६८०९८२९६
सेवानिवृत्त माजी उपप्राचार्य सोमेश्वर विद्यालय