सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात सांप्रदायिक भजन स्पर्धेत कायमच वर्चस्व ठेवणारे पोंबर्डी-भोर येथील भैरवनाथ भजनी मंडळास वारकरी सांप्रदाय पुणे वडगाव धायरी भूषण पुरस्काराने अव्वल मानांकन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे वडगाव धायरी येथे पांडुरंग भजनी मंडळ व संकल्प फाउंडेशन तर्फे आयोजित आनंददायी भजनी सोहळा आयोजित केला होता.या सोहळ्यातील भजन स्पर्धेत महाराष्ट्रातील १०३ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भोर तालुक्यातील भैरवनाथ भजनी मंडळाने भजन गायन केल्याने मंडळास वारकरी सांप्रदाय पुणे वडगाव धायरी भूषण पुरस्काराने अव्वल मानांकन पुरस्कार व सन्मान चिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सदर मंडळाचे जिल्ह्यामध्ये तसेच भोर तालुक्यात कौतुक होत आहे यावेळी गणेश शिंदे (हार्मोनियम) ,कृष्णा खोपडे (हार्मोनियम), निवृत्ती खोपडे (पखवाज अलंकार),शहाजी खोपडे ,शंकर खोपडे ,दशरथ खोपडे, शंकर खंडाळे ,गुलाब खोपडे ,शामराव चव्हाण, संजय चव्हाण, विठ्ठल लोखंडे उपस्थित होते.