सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली असून बच्चू कडूंना आता तुरुगांत जावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती आहे.
बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर होते. मात्र, न्यायालयाने आज त्यांचा जामीन फेटाळला असून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे, शिंदे गटातील प्रमुख आमदार तुरुंगात जाणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, या निर्णयावर त्यांनी तात्काळ सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतरच आमदार बच्चू कडू तुरुंगात जाणार की नाही, याचा खात्रीशीर निर्णय होईल.