दोन वर्षानंतर 'सोमेश्वर'ची वार्षिक सभा होणार ऑफलाईन...! : दोन वर्षानंतर ऑफलाईन सभा होणार असली तरी एकच विषय चार तास चघळला जाणार की महत्वाच्या विषयांवर चर्चा झडणार...?

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याची सन २०२१-२०२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि २९ रोजी होत आहे. कोविड प्रादुर्भावानंतर दोन वर्षातून ऑफलाईन सभा होत असल्याने सभासदांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र खाऊचा पुडा, साखर वाढवा, साखर मिळत नाही, उसाला तोड नाही, उसाला रस्ता नाही, शेजारचा ऊस काढून देत नाही. अशा किरकोळ विषयावर तेच ते सभासद नेहमीच चघळत असतात. काहीजण अहवालात नाव यावे म्हणून माईक बळकावतात.   तुमचे किरकोळ विषय तुमच्या गटातील संचालक, अधिकारी मार्गी लावू शकतात. किंवा साखर वाढवा सारखे विषय साखर आयुक्तांच्या हातात असतात. यामुळे सभासदांच्या हिताच्या मूळ विषयांना व महत्त्वाचा विषयांना बगल मिळते.
             श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२०२२ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक २९/०९/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील 'श्री छत्रपती शिवाजी महाराज' पुतळ्यामागील प्रांगणामध्ये आयोजित करणेत आलेली आहे. तरी सदर सभेस आपण अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
सभेपुढील विषय------
१) मागील दि. २९/०९/२०२१ रोजी झालेल्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेचा व दि. २८/०२/२०२२ रोजी झालेल्या अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) संस्थेचे सन २०२१-२०२२ या वर्षाचा मा. संचालक मंडळाकडून आलेला अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करुन घेणे व त्याचा स्विकार करणे.
३) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मा. संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजूरी देणेबाबत विचार करणे.
 ४) सन २०२२ - २०२३ या आर्थिक वर्षाकरीता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणी बाबतची नोंद घेणे.
५) वैधानिक लेखा परिक्षक यांनी कारखान्याच्या सन २०२१ - २०२२ या वर्षाच्या दिलेल्या लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेणे व मागील सन २०२० - २०२१ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवालाचा मा. संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे.
६) सन २०२२ - २०२३ वर्षाकरीता शासनमान्य लेखा परिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा परिक्षकाची नेमणूक करणे व लेखापरिक्षण शुल्क ठरविणेबाबत.
७) कारखाना वाढीव गाळप क्षमतेप्रमाणे पोटनियम क्र. २६/२ सुधारणा करणेबाबत मा. संचालक मंडळाचे
शिफारशीनुसार मंजूरी देणे. ८) सन २०२१-२०२२ या गाळप हंगामातील ऊस बिलातून भागविकास निधी योजनेअंतर्गत शिक्षण निधी कपात करणेबाबत विचार करणे.
९) ऊस क्षेत्राचे प्रमाणात शेअर्स (भाग) असणेबाबत मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या धोरणाबाबत विचार करणे.
१०) कारखाना स्क्रॅप मालाची 'ई' ऑक्शनद्वारे करणेत आलेल्या विक्रीस कार्योत्तर मान्यता देणेबाबत. ११) मा. अध्यक्षसो यांचे पुर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.
To Top