पुरंदर ! कुठलीही नोटीस न देता मतदारांची नावे वगळणाऱ्या गुळुंचेच्या तलाठ्यांना दणका : होणार विभागीय चौकशी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गुळुंचे येथील मतदारांची कुठलीही नोटीस न देता नावे वगळली म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी केला आहे. तसेच चौकशी करून मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचाही आदेश केला आहे.
          पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावच्या ३३ मतदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता तलाठ्यांनी त्यांना मतदारयादीतून वगळले होते तर वेळेत नावे देऊनही ४७ नवमतदारांची नावे समाविष्ट केली नव्हती. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत यावरून मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यासंबंधी ठराव घेतले.  मतदारांची नावे वागळताना रीतसर १३ व १४ क्रमांकाच्या नोटिसा बजावणे बंधनकारक असते. मात्र तलाठ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब न करता खोटे पंचनामे केले. हेतूपुरस्सर नावे वगळली असे तहसीलदार यांना आढळल्याने त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना दिला होता. तलाठ्यांची बाजू योग्य असल्याचा नितीन निगडे यांचा युक्तिवाद व कोतवाल नारायण भंडलकर यांचा अनुकूल जबाबही तलाठ्यांना वाचवू शकला नाही.

--------------------
दुसऱ्या गावी राहणाऱ्या काही मतदारांची नावे कुठलीही नोटीस न देता परस्पर वगळण्याप्रकरणी गुळुंचे (ता. पुरंदर) गावचे तलाठी गणेश महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचा आदेश प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी काढला आहे. तसेच  वगळलेल्या मतदारांना चौकशी करुन पुन्हा समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही तहसीलदारांना दिले आहेत.
To Top