वाई ! एक दिवस माझ्या बळीराजासाठी : विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई दिनांक 14 सप्टेंबर 2022  महाराष्ट्र शासन कृषी विभाग वाई येथे विभागीय कृषी सहसंचालक मा. श्री.बिराजदार साहेब यांनी एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रमांतर्गत भेट दिली त्यामध्ये श्री. बिराजदार यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय  येथे सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांची आढावा सभा घेऊन त्यामध्ये एक दिवस  माझ्या बळीराजासाठी  उपक्रमाचा उद्देश सांगितला व क्षेत्रीय कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर क्षेत्रीय पाहणी दरम्यान असले येथे श्री. विनायक जाधव यांच्या  सोयाबीन ग्राम बीजोत्पादन फुले किमया या वाणा च्या प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात असणाऱ्या संधी,भविष्यात सोयाबीन पिकाचे दर व वायदे बाजार याविषयी माहिती दिली. यावेळेस असले गावातील प्रगतशील शेतकरी व श्री. तानाजी यमगर कृषि सहायक उपस्थित होते. त्यानंतर पाचवड येथे  बिग बास्केट यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला संकलन केंद्रास भेट देऊन तालुक्यांतील भाजीपाला  पुरवठा करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची माहिती  व  बाजारातील मागणी  यांची माहिती घेतली. सदर भेटी दरम्यान पाचवड येथील शेतकरी व कृषी सहाय्यक वंदना आढळ उपस्थित होते. त्यानंतर व्याजवाडी येथील श्री. ज्ञानेश्वर पिसाळ यांच्या हळद,ऊस पेरू , व वांगी शेतास भेट देऊन सोलर झटका मशीन याची पाहणी केली. वाघजाईवाडी येथे श्री.बाळासाहेब यादव व अंकुश निकम यांच्या हळद व सोयाबीन पिकाची पाहणी केली.शहाबाग येथील श्री संदीप सुरेश कोरडे यांच्या कोहिनूर हळद मिल येथे भेट देऊन हळद पावडर व मिलची पाहणी केली, सदर भेट दरम्यान श्री.माणिक बनसोडे कृषी पर्यवेक्षक व सौ. रेवती जाधव कृषी सहाय्यक उपस्थित होते.त्यानंतर धोम येथील प्रगतशील शेतकरी श्री नितीन वरखडे यांच्या भात व सोयाबीन क्षेत्रास भेट देऊन सन 2021-22 मध्ये भात पिक स्पर्धेत विभागात द्वितीय क्रमांक आल्याने त्यांचा सत्कार करणेत आला.
           सदर क्षेत्रीय पाहणी दरम्यान माननीय श्री चंद्रकांत गोरड उपविभागीय कृषी अधिकारी वाई , मा.श्री. प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई, श्री. विजय गायकवाड मंडल कृषी अधिकारी मेणवली,श्री सचिन पवार व श्री. सोमनाथ पवार कृषी पर्यवेक्षक मेणवली,श्री विलास पालवी, मेणवली व वाई मंडळचे सर्व कृषी सहाय्यक, श्री प्रदिप देवरे बी टी एम, श्री योगेश जायकर, ए टी एम आत्मा तसेच धोम परिसरातील प्रगतशील  शेतकरी उपस्थित होते.
To Top