सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : धनंजय गोरे
कास पुष्पपठारच्या हंगामाला चार दिवसापुर्वीच प्रारंभ झाला असुन पर्यटकांची पाऊले या नैसर्गिक फुलांच्या कडे वळु लागली आहेत यामध्ये काही वरीष्ठ शासकीय आधीकारी राजकीय पदाधीकाऱ्यांनी पठाराला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्याचे पहायला मिळाले मात्र चक्क केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना देखील कास पठारच्या फुलांची भुरळ पडली असून त्यांनी पुष्प पठारास भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला यावेळी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले,कास हे निसर्गाचं देण असलेले अनमोल ठिकाण असुन त्याच जतन झालं पाहीजे येथील वनसंपदेचे व वनऔषधींवर संशोधन केलं पाहीजे हा परिसर अतिशय सुंदर आहे.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे आपल्या खाजगी दौर्यानिमीत्त कास परिसरतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहण्यास आले असल्याची माहीती समोर आली बुधवारी दुपारी त्यांनी कास पुष्प पठारला भेट दिली पठारवरील नैसर्गीक रंगीबेरंगी फुलांचा आनंद घेताना विविध फुलांची माहीती करून घेतली मात्र सततच्या पावसामुळे फुले पाहण्यास काहीसा अडथळा निर्माण झाला यावेळी त्यांनी वन वनसमीतीच्या कामाचा आढावा घेतला
वनसमीतीने पुष्पपठाराची फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी जावली तहसीलदार राजेंद्र पोळ वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी वनपाल राजाराम काशीद वनरक्षक स्नेहल शिंगाडे सुनिल शेलार निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे
वनसमीती उपाध्यक्ष दत्ता किर्दत सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर आखाडे विजय वेंदे सोमनाथ बुदळे आदी पदाधीकारी उपस्थीत होते