सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याचे दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे यांनी मिळविलेल्या पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा सन २०२१-२२ चा अध्यक्ष चषकाची आंबाडे येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य चषक मिरवणूक काढून शिक्षकांचा सत्कार जानुबाई मंदिर येथे पार पाडला.
आंबडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यात नावजलेली शाळा असून शाळेला विविध पुरस्कार मिळालेले आहेत.मुख्याध्यापक शिवाजी खोपडे, उपशिक्षक राजू कारभळ, खंडोबा घोलप व उज्वला भारती यांचे काम निश्चितच कौतुकास्पद असून शिक्षक, व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे शाळेला अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यावेळी सरपंच हेमलता मिलिंद खोपडे, व्य. समिती अध्यक्ष तृप्ती वाघुलकर, उपसरपंच ज्ञानेश्वर खोपडे सामाजिक कार्यकर्ते पै. शिवाजीकाका खोपडे, मनोज खोपडे, रणधीर खोपडे, पोपट खोपडे, मधुकर निकम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्य. समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.