सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसाय करून उपजीविका करीत असतात. सध्या तालुक्यातील बसरापूर,पसूरे या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपी स्कीन हा आजार झाल्याचे आढळून आले आहे तरी तात्काळ भोर,वेल्हा,मुळशी तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी शर्तीने प्रयत्न करा असे आमदार संग्राम थोपटे यांनी पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना दिल्या.
तालुक्यातील ४३ हजार ७० पशुधणापैकी २ जनावरांना लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला असून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे लसीकरण तात्काळ सुरू केले आहे.तालुक्यात १३ हजार लस प्राप्त झाली असून सध्या गायवर्गातील ५ हजार ५०० जनावरांना लसीकरण झाले आहे.तर पुढील काळात लसीकरण सुरू असल्याचे आढावा बैठकीत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ता.ल.प.स.ची भोर डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी सांगितले.यावेळी पशुधन विकास अधिकारी डाॅ.पौर्णिमा येवतीकर, डाॅ.शुभांगी गावकरे,
पशुधन विकास अधिकारी वेल्हा डॉ.धुमाळ,
पशुधन विकास अधिकारी मुळशी डॉ.सचिन काळे उपस्थित होते