सोमेश्वर रिपोर्टर टीम-- -
लोणंद : प्रतिनिधी
रावडी ता . फलटण येथे जमिनीचे कारणावरून कुऱ्हाड, कोयत्याने वार करून सेवानिवृत पोलीस अधिकाऱ्यासह तीघांना गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर लोणंद पोलीसात गुन्हा दाखल झाला.
रावडी येथील शेतजमिनीच्या कारणावरून सेवानिवृत सपोनि ब्रम्हदेव सोपान बोबडे, आकाश ब्रम्हदेव बोबडे रा. स्वरसाया बिल्डींग गोटे माळ लोणंद,यशवंत बाबुराव भोसले रा . मांडकी ता.पुरंदर या तिघांना मोहन सोपान बोबडे , आशितोष मोहन बोबडे रा.रावडी बुद्रुक ता.फलटण यांनी कुऱ्हाड, क्रोयत्याने वार करून जखमी केले. जिवे ठार मारण्यासाठी दोन्ही हाताने गळा दाबला .
या मारहानीत तीघेही गंभीर जखमी झालेत. लोणंद पोलीसात या मारहान प्रकरणी ब्रम्हदेव बोबडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय . पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.