भिगवण ! भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर सोशल मिडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण ! प्रतिनिधी
भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर मराठी पत्रकार सोशल मिडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्योती व्हेज या सुप्रसिद्ध हॉटेल येथील हॉल मध्ये नवजीवन एजन्सीच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न भिगवण मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका ,दौंड तालुका तसेच करमाळा तालुका असे तीन तालुक्यातील ३५ च्या वरती सदस्य संख्या आहे.२०१९ साली सुरु करण्यात आलेल्या संघाच्या वतीने सामाजिक तसेच शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात.मागील काही वर्षात कोरोनाच्या महामारीत पेपर वितरण करणाऱ्या कामगारांना शक्य ती मदत पुरविण्याचे काम या संघाच्या माध्यमातून करण्यात आले.तर शाळकरी विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धा तसेच सामाजिक सेवेत ज्यांनी आपला ठसा उमटविला त्यांचे नागरी सत्कार करण्यात आले. अध्यक्ष डॉ.प्रशांत चवरे यांनी पदाचे वर्ष पूर्ण होताच तरुणांना अध्यक्षपदी निवड करण्याचा मानस व्यक्त केला होता.हॉटेल सागर येथील पदाधिकारी बैठकीत याबाबत ठराव घेण्यात आल्याने अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर यांची तर सोशल सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे याची नियुक्ती करण्यात आली.
           नवजीवन पेपर एजन्सीच्या वार्षिक सभासद लकी कुपन बक्षीस वितरण समारंभावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे, मनोज काकडे प्रा.शाम सातरले ,संजय खाडे ,संजय चौधरी ,केशव भापकर ,चंद्रकात रायसोनी ,शहाजी कदम ,उपस्थित होते.
To Top