सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील
अंजनगाव, जळगाव क.प. जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, काहाटी व खराडेवाडी ही दहा गावे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून वगळून ती माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्राला जोडली जाणार आहेत.
याबाबत माळेगाव कारखान्याने सोमेश्वर कारखान्याकडे या दहा गावांची मागणी केली असून याबाबत दि २९ रोजी होऊ घातलेल्या वार्षिक सभेत ही दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याबाबत सोमेश्वर कारखान्याने वार्षिक सभेत विषय पत्रिकेवर विषय घेतला आहे. मात्र ६० वर्षापेक्षा अधिक काळ ता गावातील सभासद हे सोमेश्वर कारखान्याला सभासद आहेत. यासाठी सोमेश्वर चा सभासद ना हरकत प्रमाणपत्र देणार का? हे पाहावे लागणार आहे. माळेगाव कारखान्याला जोडल्या जाणाऱ्या अंजनगाव येथे ३००,जळगाव कप व जळगाव सुपे व भिलारवाडी येथे ३५०, देऊळगाव येथे १५०, कारखेळ व खराडवाडी येथे १००, कऱ्हाटी येथे २२५ तर नारोळी कोरोळी येथे ३२५ सभासद संख्या आहे.
सध्या उसाचे क्षेत्र वाढत असून, काही कारखान्यांचेदेखील विस्तारीकरण झाले आहे. त्यानुषंगाने संबंधित कारखान्यांनी काही गावांचा समावेश करणे गरजेचे आहे. माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ झाली असून, लागणारे उसाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. यापूर्वी माळेगावने कार्यक्षेत्रामध्ये पाच गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कारखान्याला जवळचे असणारी दहा गावांचा समावेश माळेगाव कारखान्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्या होत्या.
-------------------------
दिलीप परकाळे - सभासद सोमेश्वर कारखाना (अंजनगाव)
सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून घरोघरी जाऊन शेअर्स गोळा केले. माझे वडील माजी संचालक रामचंद्र परकाळे यांनी सायकलवरून शेअर्स गोळा केले. कै. मुगुटराव आप्पा काकडे ते सद्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकाळात आतापर्यंत आम्हाला कायम एक महिन्याची सवलत दिली गेली. ती सवलत माळेगाव कारखान्याला मिळेल का? मात्र उपमुख्यमंत्री अजित दादांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील.
--------------------------
कैलास जगताप - सभासद सोमेश्वर कारखाना (जळगाव)
सोमेश्वर करखान्याशी तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्याशी गेली ६० वर्षांचे ऋणानुबंध तोडताना भरून आल्यासारखं वाटतंय...सोमेश्वर कारखान्याने जळगाव ला संचालक पदाची संधी दिली नाही ती संधी माळेगाव कारखान्याला मिळेल का?