भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! एकतर लंपीने शेतकरी मोडलायं...! म्हैसीच्या जबड्याचे ऑपरेशन करताना शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिकाऊ डॉक्टरांनी म्हैसीचाच काढला काटा.....! शेतकरी करणार कुटुंबासह उपोषण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
शिरवळ येथील शासकीय क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारादरम्यान एका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे म्हैस दगावल्याची घटना घडली असून शेतकरी रमेश विश्वनाथ तुपे रा. पळसोशी ता. भोर यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.असा आरोप शेतकऱ्यानी केला असून न्याय व भरपाई न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे
         शेतकरी वर्ग सध्या जनावरांवर आलेल्या लंपी आजारामुळे बेजार झाला आहे. त्यातच  भोर येथील रमेश विश्वनाथ तुपे रा.पळसोशी ता.भोर येथील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील असणाऱ्या म्हशीच्या जबड्याजवळ आलेल्या घाटीच्या उपचारासाठी शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे आणले होते.म्हशीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून भूलीचे जास्त डोस झाल्यामुळे शस्त्रक्रिया सुरू असतानाच म्हैस दगावली असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात आले. संतप्त शेतकऱ्यानी वरिष्ठांकडे व स्थानिकांकडे संबंधित माहिती देऊन न्याय मिळावा याकरिता धाव घेतली.वरिष्ठांकडून ही योग्य ती दाद न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.त्यातच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शवविच्छेदन न करताच जेसीबी बोलावून म्हैस महाविद्यालयाच्या परिसरात गाडण्यात करण्यात आली. ही एकंदरीत सगळी संस्थास्पद अशी गंभीर बाब असून यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी याकरिता तहसीलदार खंडाळा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
        दरम्यान शेतकऱ्यांनी स्थानिक पत्रकार यांना प्रकार सांगितल्या नंतर पत्रकार वैद्यकीय अधिकारी यांची बाजू समजून घेण्याकरिता गेले असता त्यांनाही महिला अधिकारी  यांनी भिसे यांच्याशी दमदाटी करून गैरवर्तन केल्याची तक्रार अर्ज शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास शेतकरी रमेश तुपे यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयासमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

To Top