बारामती ! करंजेपुल येथे बॅटरीचे दुकान फोडले : तीन लाखांचा माल लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील सोमेश्वर मंदिर रोडलगतचे दुकान फोडून ३ लाख रुपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्या. 
         दत्तात्रय किसन खैरे सोमेश्वर इलेक्ट्रिकल व बॅटरी नावाचे दुकान काल रात्री चोरट्यानी फोडले. पिराच्या मंदिरासमोरील दुकानाचे व मागील गोडावणाचे कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडून ही चोरी करण्यात आली. बॅटऱ्या चोरी केल्यानंतर त्या वाहण्यासाठी शेजारील दुकानाबाहेरील हातगाड्यांवर ठेऊन गाडे चोरी केलेल्या ठिकाणावरून ४०० मीटर लांब सोडण्यात आले. 
 दरम्यान दोन चोरांनी चिखलाने भडलेल्या आपल्या चपला त्याच ठिकाणी सोडून दिल्या आहेत. तसेच ते ज्या रस्त्यावरून गेले त्या रस्त्यावर चार पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
To Top