सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी
कुटवाड (ता. शिरोळ) येथे एका जनावराचा लम्पी स्किन’ या आजाराने बळी घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील हा पहिला बळी असून या आजाराचा धोका कोल्हापूर जिल्ह्यात वाढत चालला आहे. तालुक्यात 100 हून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून जनावरांच्या वर उपचार सुरू आहेत त्यामुळे किती जनावरांना याची लागण झाली याचा तपशील मिळणे कठीण झाले आहे पंधरा दिवसांपूर्वी कुटवाड येथील एका गायीला लम्पी आजाराची लागण झाली होती. या गायीवर औषधोपचार सुरू होते. या आजारातून गायीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आज (शुक्रवार) पहाटे या गायीचा मृत्यू झाल्याचे डॉ. सागर पटेल यांनी सांगितले. आज या आजाराने गायीचा बळी घेतल्याने तालुक्यात बाधित जनावरे किती असा प्रश्न पशुवैधकीय विभागासमोर आला आहे.
कुटवाड येथील दत्तात्रय रामचंद्र पाटील या शेतकऱ्याच्या जर्सी गायीला दहा दिवसांपूर्वी लम्पी आजाराची लक्षणे दिसून आली. यानंतर पाटील यांनी आपल्या गायीवर पशुवैद्यकीय केंद्रात औषधोपचार सुरू केले होते. या गायीला ताप आला होता. तिने वैरण खाणे सोडले होते. डॉ. सागर पाटील हे त्या गाईवर उपचार करत होते. गायीला दोन दिवसांत अचानक अशक्तपणा जाणवू लागल्याने. पुढील उपचार सुरू असताना आज पहाटे या गायीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील हा पहिला बळी असून शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जनावर वैरण खात नसतील, ताप आला असेल, अंगावर पुरळ अथवा फोड आले असतील तर तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सागर पटेल, यांनी केले आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग विविध उपाय योजना राबवत आहे लंपी प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले असून विशेषता देशी व जर्सी गाय वासरू बैल यांना पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने लस देण्यात येत आहे गोकुळ व वारणा दूध संघाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे शेतकऱ्यांनीही आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे