भोर-महाड-पंढरपूर रस्त्यावरील अपघात कसे कमी करावे : राजगड ज्ञानपीठातील प्राध्यापकाचा आंतरराष्ट्रीय शोध निबंध सादर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोर महाड पंढरपूर या रस्त्यावर होणारे अपघात यांवर राजगड ज्ञानपीठ डिप्लोमा शाखेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रा.चेतन शिवतरे यांनी शास्त्र शुद्ध  व तंत्रनिहाय संशोधन करून या संदर्भात इंटरनॅशनल जनरल ऑफ इनोव्हेशन रिसर्च २०२२ चा निबंध सादर केला आहे.
          महाड पंढरपूर या महामार्गावरील अपघात कमी कसे होतील तसेच अपघात कमी होण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना आखाव्यात याविषयी अभ्यासपूर्ण माहिती या निबंधात माहिती देण्यात आलेली आहे. अशा या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे समाजास उपयोगी असलेल्या या शोध निबंधामुळे प्रा चेतन शिवतरे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. 
         या लेखनामधून प्रशासनाला फायदा होणार असल्याचे प्रा.चेतन शिवतरे यांनी सांगितले ही सर्व माहिती संकलन करतांना राजगड ज्ञानपीठाचे आ.संग्राम थोपटे यांनी मार्गदर्शन केले. पॉलीटेक्निकलचे प्राचार्य डी.के.खोपडे, विभाग प्रमुख एस.डी.निगडे, प्रा.निकलेश कंक, प्रा. दीपिका ननावरे ,प्रा.हेमंत खंडाळे ,अमोल खेसे,हनुमंत बांदल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे व राहुल खामकर यांनी प्रा चेतन शिवतरे यांचे अभिनंदन केले.
To Top