पुरंदर ! नीरा येथे जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाची सांगता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
नीरा ( ता.पुुुुुरंदर ) येथील जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाची सांगता सोमवारी ( दि.१२) सकाळी ग्रामप्रदक्षिणाने झाली. यावेळी पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. जैन धर्मामध्ये सणांचा राजा म्हणून पर्युषण पर्व मानले जाते.
             ऋषी पंचमी ते अंनत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसांचे 
 पर्व संपुर्ण भारतभर संपन्न होत असते. या पर्युषण पर्वाची 
या दहा दिवसाच्या पर्वात रोज सकाळी पंचामृत अभिषेक 
, दुपारी तत्वार्थ सुञ , संध्याकाळी आरती, शास्त्रपठण,
दशधर्माची महती तसेच वेशभुषा , प्रश्नमंच, अंताक्षरी , चिञकला , स्तोञ पठण, नृत्य अशा विविध कार्यक्रमामधून धर्मप्रभावना करण्यात आली.जैन धर्मात क्षमेला फार महत्व आहे . धार्मिक कार्य करताना अजानतेपणाने मने दुखविली जातात. तेंव्हा एकमेकांची क्षमा मागून हे पर्व उत्साहात संपन्न झाले.
                  नीरा येथे  सोमवारी ( दि.१२)  गावातून पालखीमध्ये उत्सवमूर्ती व शास्त्र विराजमान करून ग्राम
प्रदक्षिणा करीत व घोषणा देत सवाध्य मिरवणूक काढण्यात आली.  पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान  
अतुल व्होरा व संकेता व्होरा या उभयंताना मिळाला. पालखी मंदिरात आल्यानंतर चढावे ,पंचामृत अभिषेक झाला. या धार्मिक विधीनंतर पाकीचे भोजन दातार महावीर जैन व लोंढे परिवार होते. प्रिती भोजनाने पर्युषण पर्वाची  सांगता झाली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष  सर्व विश्वस्त व
जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top