भोर ! दिवंगत खा. बाळासाहेब साळुंखे यांचे स्मारक उभारणार : जिल्हा बँकेचे संचालक प्रविण शिंदे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे  यांचे आपटी  ता. भोर हे मूळ गाव असून खासदार सुप्रिया सुळे आणि दिक्षा भूमी समिती यासोबत बैठक लावून  संबधित बांधकाम विभागाकडून स्मारकाचा आराखडा तयार करुन स्मारक उभारणार असे आश्वासन पुणे जिल्हा मध्यवतीॕ बँकेचे संचालक प्रविण शिंदे यांनी दिले. 
       भोर येथील दिक्षा भूमी स्मारक सभागृहात रविवार दि. ११ रोजी कश्यप साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली  दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांची जयंती व स्मृतीदिन अभिवादन सभेचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी संचालक शिंदे बोलत होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवडीतील जेष्ठ कार्यकर्ते  वसंत साळवे , बसपा जेष्ठ नेते किरण आल्हाट , भिवंडीचे नगरसेवक विकास निकम , सहाय्यक आयुक्त मल्लिनाथ हारसुले, मुंबई सहपाल वस्तीगृह समाज कल्याण भोरचे श्रीकांत आव्हाड  , उद्योजक रामदास साळवे , बाळासाहेब आडसूळ , एकनाथ गायकवाड , किशोर आमोरिक , मयुर गायकवाड  , रंजना कांबळे , गोंविद रणखांबे ,   भोर तालुका बौद्धजन संघ , सर्व पदाधिकारी , भोर तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळ संघटना उपस्थित होते. 
         दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे हे  खेड मतदार संघातून खुला गटातून भोर संस्थान काळातील पहिले खासदार असून  आरोग्य मंञी , शिक्षण मंञी ही खात्याचे काम पाहिले ते भोर तालुक्यातील होते . त्यांचा जन्म शताब्दी , जयंती एकाच दिवशी येत असल्याने साजरी केली जाते. त्यांचे आपटी येथे स्मृती स्तंभ आहे.प्रास्तविक  कश्यप साळुंखे , सुञसंचालन राजन घोडेस्वार ,आभार सुनंदा गायकवाड यांनी मानले. 
To Top