सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारी साखर दि १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
याबाबत कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हणटले आहे की, माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये “दिपावलीचा" सण येत असल्याने दिपावलीची साखर घेऊन जाणे करता गर्दी होऊ नये. याकरीता कारखाना व्यवस्थापनाने सवलतीच्या दराने सभासदांना दिपावलीच्या सणाकरीता वाटप करणेत येणारी साखर ही दि.१५/०९/२०२२ पासून मिळणार आहे. सभासदांना प्रतिकार्ड ३० किलो तर कामगारांना प्रतिकार्ड १० किलो साखर १५ रुपये दराने ही साखर उपलब्ध होणार आहे.
मात्र ३१ डिसेंबर २०२२ अखेर दिपावलीची साखर घेवून जाणेची खबरदारी घ्यावी अन्यथा मुदतीत साखर न नेल्यास ती कोणत्याही परिस्थितीत मुदतीनंतर दिली जाणार नाही.