सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याचे दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे येथे दर शनिवारी दप्तरा विना शाळा उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शनिवार दि.२४ शाळेत चिमुकल्यांचे काव्य संमेलन पार पडले.
या संमेलनात ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतः कविता तयार करून सादर केल्या. कार्यक्रमप्रसंगी शेकडो मुलांच्या कवितांचा "काव्य बहार" काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.यावेळी साळुंगण प्राथमिक शाळेतील शिक्षक व कवी परशुराम लडकत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.तसेच गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, सरपंच हेमलता मिलिंद खोपडे, उपसरपंच ज्ञानेश्वर खोपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तृप्ती वाघुलकर, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज खोपडे, पोपटराव खोपडे, शितल निकम इत्यादी पालक उपस्थित होते.उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शिवाजी खोपडे,उपशिक्षक खंडोबा घोलप, राजू कारभळ, उज्वला गिरीगोसावी यांनी उत्तमरीत्या केले.
मुलांच्या सुप्त कलागुणांना व मुलांच्या भावविश्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.