बारामती ! पत्रकार युवराज खोमणे व कुस्तीपट्टू सायली जगताप यांना उमाजी नाईक पुरस्कार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील पत्रकार युवराज खोमणे यांना पत्रकारिता क्षेत्रातील व वाणेवाडी येथील सायली जगताप हिला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आद्याकांतीवीर उमाजी नाईक पुरस्कार जाहीर झाले आहेत. 
            होळ ता बारामती येथे सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धापरीक्षा विनोद चव्हाण, कलाक्षेत्र शिवम जादूगार, स्पर्धापरीक्षा श्रद्धा होळकर, शिक्षण क्षेत्र अनिल गवळी यांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी जयमल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत शितोळे, बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संजय जाधव व नानासाहेब मदने उपस्थित राहणार आहेत.
To Top